आंबट चेरीमध्ये चांगल्या प्रमाणात अ आणि क जीवनसत्त्व, थोडय़ा प्रमाणात ब जीवनसत्त्वाचे काही प्रकार, के जीवनसत्त्व आणि मँगनीज, पोटॅशियम यासारखी खनिजं असतात.
चेरीमधल्या अॅन्योसायनिन्स या फायटो केमिकल्सवर सध्या खूप संशोधन चालू आहे.
स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी साधारणत: थंड तापमान आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते.